STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Abstract Others

4  

shubham gawade Jadhav

Abstract Others

अंत नाही

अंत नाही

1 min
571

दुःख भऱ्या डागण्यांचा अंत नाही

वेड्या माझ्या मनाला याची खंत नाही


गुंतून स्वतःमध्ये स्वतःशिवाय दुसऱ्याचा

विचार करणारा असा उदार श्रीमंत नाही


स्वार्थापोटी भावना इथे शून्य झाल्या

करण्या मदत कोणास उसंत नाही


कातडे पांघरलेत माणुसकीच्या ढोंगाचे

जाईल स्वर्गलोकी असा पुण्यवंत नाही


तोडील बंध सारे षडरिपूंचे या

असा सामर्थ्यवंत कोण नाही


होऊन निष्ठुर कपटी असे

जिने मला पसंत नाही


जरी असली हालचाल देहाची या

जीव असूनही त्यात ते जिवंत नाही


झाल्यात चुका कैक अशा हातून पण

आता सामावून घेणारा आसमंत नाही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract