STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Abstract Inspirational

4  

Sanjay Dhangawhal

Abstract Inspirational

आयुष्याच्या अखेरीस

आयुष्याच्या अखेरीस

1 min
457

आयुष्यभर कष्ट केलीत

पण मनासारखे जगता आले नाही

राब राब राबत गेलो

पण माणस् कळली नाहीत


वेदना यातना भोगूनही

दुःख दुर जात नव्हते

सुखही आडोसा घेवून

वाकुल्या दाखवतं होते


ईच्छा साऱ्या दुर ठेवून

आयुष्यभर गरज सर्वांची पुर्ण करत राहीलो

स्वतःसाठी कमी मात्र

दुसऱ्यांसाठी जास्त  जगलो


क्षण आनंदाचा 

कधी घेता आला नाही

आनंदाच्या क्षणात कधी मी दिसलो नाही


नोकरी असेपर्यंत

सारकाही सुखासीन असतं

त्यानंतर मग सारकाही 

उदासीन दिसतं


निवृत्ती म्हणजे आरामाचे

दिवस असतात

त्या आरामालाही सारेच कसे

कंटाळलेले दिसतातं


आयुष्यभर मरमर केली

याचा कोणी विचार करत नाही

पैशाशिवाय कोणी जवळचा वाटत नाही


काय कुठे जमापुंजी असेल ती सांगून द्या

असा रोज उपदेश देतात

कागदपेन धरून नावे करण्याचा आग्रह धरून बसतात 


 आयुष्याच्या अखेरीस

आपलेपणा पेक्षा

दुरावा जास्त असतो

काळजी घेण्याऐवजी

मनात स्वार्थ जास्त दिसतो


शेवटी काय प्रॉपर्टीवर डोळा ठेवून

खोट प्रेम करता

प्रॉपर्टीसाठीच तर सारे

 आपसात भांडून नात्यागोत्यांच विभाजन करतात


जे कमावतो ते सार

वारसदारांच्या हक्कात जाते 

स्वतःसाठी मात्र पेन्शनशिवाय 

काहीच नसते


मेल्यानंतर स्मशानात 

पोहचवण्यापुरताच

आधार असतो

त्यानंतर कोणाच्याही

आठवणी नसतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract