तू.
तू.
तू असशील कुणी मोठी अधिकारी करतं असतील बाहेर सलाम तूझ्या पदाला.
वाटत असेल दहशत तुझ्या रूबाबाची
करीत असशील चार, किंवा पाच आकडी पगाराची नोकरी जरी.
संसाराच्या चार भिंतीत तुला चुकत नाही स्वयंपाकाची वारी. 1
तु लढली असशील झगडली असशील, खुप कष्टातून स्वःताला सिद्ध केले असशील
खूप स्वपन पाहिली असशील बरीचशी पुर्ण ही केली असशील.
असतील महत्वाकांक्षा तुझ्या ऊरात साठलेल्या अजुनही जरी
घर सांभाळण्याची कसरत चुकणार नाही तरी 2
तू बाहेर घरात राबशील पोरांची शी शु काढशील
नवरयाची मर्जी राखशील. पैपाहुना नातीगोती सांभाळशील
तु थकशील, वैतागशील कुणापुढेही मन मोकळं केलंस जरी
ते दाखवतील तुलाच जबाबदारी 3
तु जरा निवांत पहुडशील डोळे बंद करून थोडं सुखावशील
शांतपणे गाढ झोप घेण्य च्या स्वप्नात रंगशील
तेव्हढ्यात आई या हाकेने क्षणात धडपडत ऊठशील
आवाजाच्या दिशेने धावत जाशील.
तुझं पद, तुझी थकावट तुझा शीन तुझ्या सारया जगान आखून दिलेल्या जबाबदारया
तू क्षणभर पुर्ण विसरशील कारण आता तु फक्त आई असशील.
तूझ्य लेकराच्य सादाला प्रतीसाद देशील
मग पुन्हा संसाराच्य रहाटगाडयात विलीन होशिल....नव्या उमेदीने......... 4
