आपुलकी
आपुलकी
असतात असे काही ऋणानुबंध
दडलेले असतात त्यात जिव्हाळ्याचे संबंध
कधी अबोला, कधी मजा,मस्ती
नात्याला कशाची नसते जबरदस्ती
ओढ असते फक्त आपुलकी आणि प्रेमाची
चुकले माकले तरीही नाते असेच असावे कायम
एकाने रुसल्यावर दुसर्याने मनवावे
आनंदाशी बिलगता हर्षित व्हावं मन
जिव्हाळ्याचा माणसांची नेहमी
आपुलकीनेच वागावं
आसमंत कवेत घेता सौख्याच्या छायेत न्हाऊन निघावं
असंच एकमेकांच्या सोबतीने जगावा प्रत्येक क्षण
असतील असंख्य प्रश्न जरी सामोरी हिंमतीने
शिखर पार करावं
हळव्या मनाशी, हळव्या व्यथा
गहिवरल्या स्मृती एकमेकांच्या कधीतरी वाचत जावं
तिमीरातल्या वाटेवरचा कुठेतरी
तेजोमय किरणांचा प्रकाश होऊन
मनातल्या भावनांचे
घर पुन्हा काहीसं
मातीच्या अंकुरातून रुजावं
प्रेम उधळाव सर्वत्र, आपुलकीची भावना मनी असावी
मुक्त मनातून सार निरामय व्हावं
माणुसकी, आपुलकी जपायला लागतेच काय...?
प्रेम, अन् काळजीचे
काही मनातले भाव
म्हणून हेवेदावे, गैरसमज न करता
नात्यातील ऋणानुबंधाना अलगदपणे जपावं
समोरच्याला कधीतरी आपुलकीच दान द्यावं
