STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

अंतःस्वर माझा

अंतःस्वर माझा

1 min
479

सूर आहे आत माझ्या

आर्त विराणी गातसे

आस जरी गायनाची

शब्द ओठी अडतसे


गोड झंकार सूरांचे

देती कधी स्फूर्ती मला

परि होई गलबला

सूर आत अडकला


कधी आक्रोश किंकाळ्या

मज भेसूर भासती

सूर आतल्याआतचि

गान सुंदर दाबती


जग सुखे भारलेले

लोचनांनी न्याहळावे

सूर कंठातूनी ओठी

गीत गातच रहावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract