STORYMIRROR

Suhas Bokare

Abstract Tragedy

4  

Suhas Bokare

Abstract Tragedy

म्हणे माजले काहूर!

म्हणे माजले काहूर!

1 min
506

मला वाटले... लाजून तू चूर होतांना...

दिली हाक होती लाजरी... दूर होतांना!


असे काय आहे की तुला पाहवेना ते...

इथे काळजाला हार मंजूर होतांना 


हवे काय आता... काळ येऊन सांगेना

बघावेच काळाला जरा क्रूर होतांना


जरी भेटलो मी काल त्या गोड गाण्यांना 

बरे भेटले ते आज बेसूर होतांना 


कसे मोहळाला बांधले आग असतांना 

म्हणे माजले काहूर तो धूर होतांना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract