STORYMIRROR

Nivedita Kenge

Abstract

4  

Nivedita Kenge

Abstract

नवा सूर

नवा सूर

1 min
581

तीच मैफिल, तोच मंच, मात्र बदलले सूर काही

प्रयत्ने आळविता तयास, व्यापतात दिशा दाही


मिसळले एकमेकांत दोन्ही, कालचे अन आजचे

मिश्रणातही दोघेजण, उमटतात एका लयीचे


जिवंत त्यातला प्रत्येक, शोधत आहे नवसंगीत

रसिका मोहवण्याचा छंद, असे तयाच्या पुढ्यात


रसिका मोह अनावर, कवटाळी तया केवर

मिश्र सूरांत रमे तो खोल, गवसला तयास नवीन सूर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract