STORYMIRROR

Nivedita Kenge

Romance

3  

Nivedita Kenge

Romance

हातातून हात निसटतो जेव्हा

हातातून हात निसटतो जेव्हा

1 min
415

सागराच्या प्रचंड लाटा

किनाऱ्यावर येऊन आदळतात

डोळ्यातले थेंब काही

नकळत कडा ओलांडतात

हातातून हात निसटतो जेव्हा...


तिच्या अन त्याच्या सोबतीचा

किनारा साक्षीदार होतो

दोघांच्या सहवासाचा गंध

आजही ओल्या मातीत दरवळतो

हातातून हात निसटतो जेव्हा....


त्याचा आभासी स्पर्श

तिला क्षणभर लाजवतो

हाच त्याचा आभासीपणा

पाहून पाऊसही लाजतो

हातातून हात निसटतो जेव्हा....


हा विरह सरण्याची आशा

तिच्या मनात डोकावते जेव्हा

मुक्या कळीचे बोलके

फुल उमलते तेव्हा

हातातून हात निसटतो जेव्हा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance