वसा
वसा
बहू मोलाचे संदेश नि विचार, तिने मजपाशी आणिले
आत्मसात करतांना तिने, रीतीरूपी बळ दिले
मज कवटाळून उराशी, लेकराचे स्थान देऊ केले
ती माझी माय मराठी, जिणं बहरायला शिकवले
तिच्या निष्पक्ष मायेची ओल, अखंड मुरते आहे
तिच्या समृद्धीतून जन्मणारी संस्कृती घडते आहे
कैक पिढ्यांचे योगदान ती अविरत वाहत आहे
अशा संस्कृतीत घडण्याचे सौख्य लाभले आहे
तिच्या शुद्धतेचे पालन हेच परम कर्तव्य असे
मी अवलंबलेल्या मार्गांवर येतील तिचेच ठसे
बहू काळजीने टाकत प्रयत्नांची एकेक पावले
जतनाचा वसा घेत मज सेवकाचे भाग्य लाभले
