प्रेमपाखरू
प्रेमपाखरू
तु असतांना मनाचं पाखरू बेभान होऊन उडत असतं..
इतरत्र सर्वांशी अनोळखी होऊन वावरत असतं..
त्याच्या चौकटीत केवळ तुझं अस्तित्व अग्रभागी असतं..
तुझ्या एका झलकेची ते आतुरतेने वाट पाहत असतं..
तु भेट म्हणालास, तर त्याचा आनंद गगनात मावत नाही..
पण त्यास भेटायचे झाल्यास स्वतःहून बोलण्यास धजत नाही..
तु नाहीस हे पटवून घ्यायला कधीच तयार होत नाही..
कारण तुझी सततची सोबत त्याला हा विचारच करू देत नाही..
तुझ्यासोबत अमर्याद उडण्याची स्वप्न त्यास पडत असतात..
तु असतांना त्याचे सारेच क्षण जणू काही उजळत असतात..
त्याला होणारे आभासही खरे वाटू लागतात..
तुझ्यासोबत घालवलेले सारेच क्षण आठवणी वाटू लागतात..
हे मनाचं पाखरू सतत कावरं बावरं होत असतं..
त्याच्या भावना तुझ्यासमोर मांडायला बिचकत असतं..
तुझ्याशिवाय त्याचं विश्व भावनाशून्य होतं..
नाही म्हणता म्हणता पुन्हा तुझ्यातच गुंतत जातं...

