STORYMIRROR

Nivedita Kenge

Others

3  

Nivedita Kenge

Others

माझ्या कवितेस...

माझ्या कवितेस...

1 min
369

कधी घडेल गं भेट आपुली, कधी जुळतील गं गाठी

कधी होईन मन वासनाहीन अन् शब्द फुटतील ओठी


होतीस क्षणभर शेजारी, हायसे झाले मन

बरसून झालीस मोकळी, पुन्हा दाटले हे मळभ


आता मात्र बरसण्याचा का पाहशी अंत

तुझ्या अशा विलंबाला खरी मीच कारणीभूत


दोष नाही लावत मी मात्र दुरुस्ती करवत आहे

जाणत्या जोडणीतून माझा संसार थाटत आहे


या संसारामध्ये खरी तूच साथीदार

मी असेन सुस्थितीत मग तू ही बहारदार.


Rate this content
Log in