STORYMIRROR

Nivedita Kenge

Abstract

3  

Nivedita Kenge

Abstract

विचारास

विचारास

1 min
223

तु असाच ये अन तसाच ये, जीव तेवढा लावू नकोस

तु आज असशी क्षणात लपशी, अंती मज ओढू नकोस


आरंभ तुझा, विश्वास तुझा लाघवी असे सौंदर्य तुझे

तु तुझ्यात असशी खोलखोल, नाद तुझा माझ्यात वाजे


रंग रंग कधी बेरंग तु, तुज कसले भान तयाचे

गंधित होऊन या रंगातून, बहरून तुला उगवायचे


संपर्क तुझा मजपाशी जरीही, कानाडोळा माझा असे

नसे सारखा तोच परि तुजवाचून मज कोण असे


असाच तु असशी मजपाशी, कशी तुज दूर लोटू मी

तुजवाचुनी जगणे अधुरे, कशी मजला पाहू मी


क्षण इवलेसे असती जरी, भासतोस विशाल तु

अर्थपूर्ण अस्तित्व तुझे, म्हणुनी असशी प्रगल्भ तु


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract