तो आजही बरसला...
तो आजही बरसला...
1 min
313
तो कालही होता अन आजही आला
झंकार येथे सोडून निघूनही गेला
तो तसाच अगदी कालसारखा
बरसला घेऊनी रंग नवखा
आला जरी न चुकता आठवणींचा घेऊनी गठ्ठा
सहज मी डोकावता त्याकडे "आहे ना लक्षात" म्हणला पट्ठ्या
किंचित नजर भिरकावूनी मी ही "हो" म्हणाले
अचानक चक्षुभोवती सूक्ष्म थेंब साठले
स्पर्शता जाणवते आहे वळण मी चाललेले
अन आज दिसते आहे मीच मला सावरलेले
क्षण ओसंडून वाहता मी ही वाहत गेले
कुठे कशी जात आहे भान हरपून बसले
तो ही तसाच अन मी ही तीच
त्याने झंकार बदलला आणि बदलले माझी मीच
एकमेकांस देत टाळी मनसोक्त हसलो
आठवून भूतकाळ दोघेही बरसलो
