नोकरी
नोकरी
का अशी पावसाची झडी लागली
खोदतांना मनाला खडी लागली
शिक्षणे घेतली अर्थशास्त्रातली
मास्तरांची तरी का छडी लागली
नोकरी मागता दाखवी पात्रता
नोट त्यांना अशी तांबडी लागली
चोरट्यांनी दिली खूप आश्वासने
ओळखी नोकरीला बडी लागली
रोज त्यांना जरी बाटली पाजली
बेवड्यांना तरी कोंबडी लागली
नोकर्या चांगल्या ठार केल्या कुणी
दार का बंद झाले कडी लागली
दुथडी वाहणार्या नद्या आटल्या
पावसाला दिसू ती थडी लागली
