STORYMIRROR

Aparna Kulkarni

Abstract

4  

Aparna Kulkarni

Abstract

कुंकू

कुंकू

1 min
486

आज लावलं मी

तिच्या कपाळी

सण समारंभात

सर्वांसमक्ष कुंकू

गात्र गात्र तिची

फुलून आली

रंध्रारंध्रातून अस्तित्वाची

हिरवी पालवी

नवचैतन्याचा जागर

करती झाली

तिच्या त्या भव्य

कपाळावर तो लाल टिळा

आज तिला अन मला

उगवतीचा सूर्य भासला

स्वाभिमानाच्या ज्योतीने

तिच्या अंतर्मनाचा

गाभारा उजळला .....


अजूनही समाज

पूर्णतः बदलला नाही

या शल्याची बोच

किती दिवस काचत राहणार ....

किती दिवस काचत राहणार ....


आजही विधवेला पूजाप्रसंगी

सर्वांदेखत बिनदिक्कत

ठेवल्या जाते वंचित

त्याक्षणी हजारो विंचवाच्या

नांग्या करतात

तिच्या मनावर डंख

आतून पेटून उठते तिचे मन

करण्यास बंड 

पण

होत जातात हळूहळू

भावना तिच्या थंड

आणि आपण फुंकत बसतो

बुरसटलेल्या विचारांचा शंख ...


कुंकू लावणारी असेल

कुणी नवती पोर

हळूच होते तिच्या कानात

मग कुजबुज

राख बाई आता तूच

परंपरेची बुज

लाऊ नकोस

अमुक अमुकला कुंकू

अन म्हणणारीच्या मनालाही

होत राहतात डंख

अन ही डागणीही

जाळत राहते तिघींचेही मन .....

तरीही कोंडी अजून मात्र

अजूनही सुटत नाही

अन चुकीच्या रूढी परंपरेतून

आपण पूर्ण बाहेर निघत नाही 

आपण पूर्ण बाहेर निघत नाही......

अन तरीही 

आपण सुधारलेलो ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract