STORYMIRROR

Aparna Kulkarni

Others

4  

Aparna Kulkarni

Others

वनराई

वनराई

1 min
290

हिरवा शालू नेसून

वनराई सजली

सुंदर पुष्पे तिने

कुंतली माळली...


सूर्यकिरणांनी दृष्ट

तिची काढली

मग शोभा तिची

अजूनच वाढली ....


खळखळ झरे

शुभ्र वस्त्र नेसले

पक्ष्यांचे मोहक थवे

जलक्षुधेस थांबले..


हरिण कळपातील

गोड पाडसे आनंदात

हरित मखमालीवर

स्वच्छंदे बागडतात ....


नाजूक लतावेली बिलगती

एकरूप होण्या वृक्षांशी

तयांचा करूनी पाळणा

वानरसेना खेळे पिल्लांशी....


फळांनी डवरलेल्या

वृक्षांवर खगांची सुंदर

सुंदर घरटी दिसती

कलरव भासे मनोहर....


वनराईत या विविधरंगी

फुलपाखरे मोहवीती

डोंगर दऱ्यातून मयूर

लांडोरासह दर्शन देती...


उंच उंच गवतांची पाती

कोळ्यांची जाळे त्यावरती

खाली नाजूक नाजूक

रानफुले कीटक आकर्षिती..


जैवविविधतेने वनराईचे

खुलले अनुपम वैभव

आठवणींच्या कप्प्यात

साठवूया हे अनुभव...



Rate this content
Log in