STORYMIRROR

Aparna Kulkarni

Abstract

3  

Aparna Kulkarni

Abstract

रंग मेहेंदीचा

रंग मेहेंदीचा

1 min
1.3K

रंग मेहेंदीचा हो मेहंदीचा

चढवितो बाई गाली लाली

सजणाच्या नावाने खुलली

सांगा आज कुणाची कळी ? ....१


ध्यानी मनी स्वप्नी होता

तो ग माझ्या सखीच्या

आज हाती रंगला बघा

रंगात रंगून मेहंदीच्या .....२


रीत ही संसाराची न्यारी

मेहंदीच्या शकुनाने

झाली आज ही नवरी

जादू केली साजणाने .....३


चला सखीला भरवूया

चार घास हे प्रेमाने

दणाणून सोडू लग्नघर

मेहंदीच्या नाचाने .....४


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract