STORYMIRROR

Aparna Kulkarni

Romance

3  

Aparna Kulkarni

Romance

गुंफू धागा विश्वासाचा

गुंफू धागा विश्वासाचा

1 min
382

धुंद प्रीतीची मधु सांज

लेवून आली सोनसाज

सख्या हाती घेऊन हात

एकमेकांचे होऊ आज ....१


भास्कराने केला बघ

आहेर खास केशराचा

साक्षीने त्याच्या आपण

गुंफू धागा विश्वासाचा .....२


रवि किरणात न्हाऊ

स्वप्न सौख्याचे पाहू

प्रीतीचे गोड गीत गाऊ

आनंदाने सोबत राहू ........३


सोनसळी या लाटांत

चिंब भिजू रे प्रेमात

सांग ना सख्या आणिक

काय हवे रे जीवनात ....४


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance