STORYMIRROR

Aparna Kulkarni

Abstract

3  

Aparna Kulkarni

Abstract

वनसंपदेचे मोल

वनसंपदेचे मोल

1 min
172

चला मुलांनो चला मुलांनो

वनसंपत्ती आपली वाचवू या ।धृ।


सुंदर सुंदर लतावेलीवर

फळाफुलांची मोहक नक्षी

थव्या थव्याने येती पहा 

आनंदाने येथे विविध पक्षी ....१

       चला मुलांनो ....... ।धृ।


नाजूक नाजूक किती या

फुलपाखरांच्या प्रजाती

इवल्या काजव्यांची रोषणाई

विलोभनीय दिसे हो राती......२

      चला मुलांनो .........।धृ।


जैव साखळीचा हा दुवा

कोणी न उगा मारावा

वनांत सर्वत्र मुक्त संचार

सर्व प्राण्यांचा असावा। ...३

      चला मुलांनो ........।धृ।



मृदा, खनिजे, धातू

लाकूड, दगडी कोळसा

औषधी द्रव्ये, डिंक,मध

हा सारा अलौकिक वारसा ....४

       चला मुलांनो ........।धृ।


अबाधित ठेवण्यास

प्राणवायूचा पुरवठा

वृक्षतोड ही थांबवूया

प्राण्यांना देऊ पाणवठा ....५

     चला मुलांनो ....... ।धृ।


जपता ही वनसंपदा

राहील जैवविविधता

एका आगळ्या धनाचे

होऊ आपण पालनकर्ता .....६

      चला मुलांनो .......।धृ।


पर्जन्य, जीवावरण

यांचा राखू समतोल

रुजवू या जनामनात

या वनसंपदेचे मोल ....७

      चला मुलांनो........ ।धृ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract