सोनपाऊली आली दिवाळी
सोनपाऊली आली दिवाळी
1 min
396
नक्षत्रांचे लक्षदीप उजळीत
सोनपाऊली आली दिवाळी
दवबिंदूंचे हे माणिक पैंजण
गाती पहाटेस अमरभूपाळी
सुर्यकिरणांची ही चैतन्यदायी
प्रसन्न मंगलदायक सुरावट
पुलकित करते तनामनाला
ओसंडतात आनंदाचे मधुघट
समीराच्या मोहक नृत्यातून
पसरतात मधुर सनईचे सूर
अश्विनाच्या या रमणीयतेत
शाल धुक्याची दिसे दूर दूर
सोनपिवळा गेंदेदार झेंडू
सज्ज झाला बांधून तोरण
सोनेरी सुखाच्या या ओंब्या
सरसावतात देण्या मधुक्षण
