STORYMIRROR

Aparna Kulkarni

Others

3  

Aparna Kulkarni

Others

चैतन्य गीत

चैतन्य गीत

1 min
188

स्वर्णीम तेजाचे करीत शिंपण

आला पहा प्रसन्न दिनमणी

नवंउन्मेषाचे चैतन्य गीत

रुणझुणे हसऱ्या पिंपळपानी


स्वागतास आतुरली

प्रेमळ ही अवनी राणी

चराचरातून निनादती

मंजुळ मंगल गाणी


पहाटेस होई सुंदर

स्वर्गीय अनुभूती

किलबिल पक्षी सांगती

जीवना द्या हो गती।


Rate this content
Log in