तिन्ही सांज
तिन्ही सांज
1 min
322
हळव्या मनावर करीत
नाना रंगाची उधळण
आली पहा तिन्हीसांज
मायेचे चांदणं शिंपण ....१
रानात वाजतो पावा
सुखाचा चाखता मेवा
वेध लागती परतीचे
अंतरी चैतन्याचा ठेवा .....२
फुलला कर्माचा इंद्रधनू
तेवती ठेवू आशेची पणती
आठवांचा हिंदोळाच आता
आहे पहा आपुला सोबती ....३
स्नेहफुलांनी घट्ट ठेवली
मैत्रवीण सदैव नात्यांची
झाली अलवार तिन्ही सांज
आता आस ईश चरणांची ......४
