STORYMIRROR

Aparna Kulkarni

Abstract

3  

Aparna Kulkarni

Abstract

स्नेहरंग उधळू या

स्नेहरंग उधळू या

1 min
383

धरली होती जराशी

मनावर हो काजळी

दूर करण्यास आली

पहा हो ही दिवाळी ......१


पणती इवलीशी

धीराने मिणमिणते

अस्तित्वाने तिच्या

मन आनंदाने उजळते .....२


आनंदाचा दीप हा

उत्साहाचे दान देतो

नवचैतन्याने देहाचा

कप्पाकप्पा तेजाळतो .....३


प्रसन्नतेच्या तोरणाने

मनमंदिर सजवूया

या दीपोत्सवी पर्वात

हर्षाने स्नेहरंग उधळू या ......४


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract