STORYMIRROR

Aparna Kulkarni

Abstract Others

4  

Aparna Kulkarni

Abstract Others

आयुष्याचे गणित

आयुष्याचे गणित

1 min
253

आयुष्याचे गणित सोडवूया

राग द्वेषाला शून्याने गुणूया

पाटीवर येता निर्विचाराचे शुन्य

सुहास्य जीवनी फुलवूया


दुःखाची वजाबाकी करून

नैराश्याशी कट्टीच घेऊया

आनंदाची बेरीज करत जाता

समाधानाचा गुणाकार करूया


हस्यरंगी कुणा रंगविणे

नफा मोठा समजूया

तोट्याचा विचार नात्यात

जरा खुंटीला टांगूया


आनंदाचे सुंदर कारंजे

हेच सूत्र अन समीकरण

मदतभावनेचा करून वर्ग

समाजोपयोगी ठेवू आचरण


भूमिती सोपी करू छान

स्नेहाचा परीघ वाढवूया

कोनांचा अभ्यास करून

विशाल दृष्टिकोन ठेवूया


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract