फार वाईट गरिबी
फार वाईट गरिबी
सगळं कळत असूनही येड्याच सोंग घ्यायचं
चुकत असला पैसेवाला तरी तुझंच खरं म्हणायच
त्याच्या पाणचट विनोदावरही हसायचं
आपलं काम असतं म्हणून गप्प सोसायचं
कसाही दिसत असला तरी हिरोच हायस म्हणायचं
अडलेलो असतो आपण म्हणूनच गाढवाच पाय धरायच
गरजवंताला अक्कल नसते चल म्हणलं तिकडे जायचं
काहीही म्हणाला तरी साहेब तुमचच खरं म्हणायचं
किळसवाणा वागला तरी वाह वा करत राहायचं
पैश्याच्या जोरावर बापाच्या वयाच्या लोकांना ही त्यांच्या नावाने बोलायच
निम्म्या वयाचा नसला तरी त्याला मालक मालक म्हणायच
फार वाईट असते गरिबी गप्प सगळं नुसतं बघायचं
