जमलं नाही तुला
जमलं नाही तुला
कोणाच्या प्रेमात पडणे जमलंच नाही मला,
मी केलं खूप पण जमलं नाही तिला,
नुसतच कळायला लागलं आणि प्रेमात पडलो
पण काही कळायच्या आता खूप दूर झालो,
बरयाच शप्पथा वचन दिली होतीस मला
खरं सांग आठवतय का काही तुला
रात्रीचा दिस करून बोलत होतीस मला
का मग न सांगता सोडून गेलीस मला
श्वास घ्यायला विसरत होतो पण विसरलो नाही तुला
एकाच ताटात जेवत होतो आठवतय का तुला
नशिबात नाही माझ्या तू,पण अजूनही आवडतेस मला
कळतच नाही कसू सांगू आजही तितकीच आवडतेस मला
अजूनही खूप आठवण येते मला, मी समजलो नाही का तिला?
मोबाईल नव्हता तेव्हा लिहायच प्रेम पत्र तिला,
खूप समजावून सांगितलं पण कळलं नाही तिला
जगतोय आता तुझ्या शिवाय हे कळलं मला पण
अजूनही तुज्यातच जीव आहे हे कळणार नाही तुला
खूप एकटं सोडलस मला पण अजूनही करमत नाही मला
न सांगता आलीस आणि तशीच सोडून निघून गेलीस मला
खरं सांगू जे बोललीस ते जमलं नाही तुला
काळीज होतीस माझे हे कधीच कळणार नाही तुला
मी निभावल पण जमलं नाही तुला
