आपल खेडं
आपल खेडं
1 min
325
नाईलाजाने का होईना पण खेडं गड्या गाठलं,
चमचमत्या नगरीच प्रेम आता आठलं,
Ac ची सवयी पोरानं येनार नाही झोप,
हे कारन आत्ता साफ खोटं ठरलं,
सेल्फी पुरता का होईना शेत आता गाठलं,
बिसलेरी नाही मिळत मग गावाकडचं पाणी बी आता लय गोड लागलं,
ब्रँड,क्वालिटी स्टेटस सगळं हे तात्पुरत हाय हे पुन्हा खरं ठरलं
डी मार्ट ,माँल ह्यामध्ये पण तेच मिळतं
जे गावातल्या दुकानात असत हे आत्ता पटलं,
महाग स्वस्त हे फक्त दिखावा हाय खेड्यात सुद्धा कशालाच कमी नाय
आहे गावंढळपणा इथ पण जगणं रुबाबात हाय,
कमी तर कशाचीच नाय ।
इथं माणूस माणसात हाय,
शहरातल्या सारखा फक्त पैश्यामागे नाय,
हे आता पटलं ,नाईलाजाने का होईना पण खेडं गड्या गाठलं।
