हो सखी शस्त्रधारिणी
हो सखी शस्त्रधारिणी
काय करावे कळेना
अशी स्थिती समाजाची
नारी असे वंदनीय
दयनीय स्थिती तिची!! (१)
बाल कुमारी तरुण
किंवा असो वयस्कर
चाळे करी नराधम
येई वासनांना पूर (२)
लाज लज्जा नसे ह्यांना
वासनांध नरपशू
एकेकाला शिक्षा देऊ
मारु झोडू हाकलवू (३)
नारी असे जन्मदात्री
माय लेक नि भगिनी
प्रस्थ वासनाकांडांचे
उधळवू त्वरे झणी (४)
तूच दुर्गा तूच काली
घ्यावे शस्त्र आता हाती
संहारावे नराधमा
मरणाची द्यावी गती (५)
