STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

भरवत बाजार विकतो काही

भरवत बाजार विकतो काही

1 min
171

भाव भावाला भेटे  

करून दुनिया बाजार 

अभावात गरजेच्या 

माग मागणीला मिळून 


असा प्रकृतीचा व्यवहार

तयात रमतो जमाना

फिरवत ओढत मना 

गुंता करून सोडवतं 


लाग लागून तोलाईत 

देण घेणं येतं 

मिळवून मिळकतीचे  

बसवून परिपाठ 


चाले चक्र संसाराचे  

मोजत सुखाचे क्षण 

विसरून दुःखाचे मेळे 

 मूल्य आधारावर ठरवून 


विकतो दर्जेत सामावून 

पहात हित हिताचं 

मांडत दुकान जगण्याच 

भरवत बाजार विकतो काही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract