STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

मी कुणाचा

मी कुणाचा

1 min
212

मी असाच बैठकीत बसून एकदा 

बोलून तयामधी पेचात पडलो ना  

मी कुणाचा? सत्याचा की नात्याचा 

कुणास काय बोलावं न बोलता 


कधी असेच विषय चाळतो मनी 

गोंधळ करून मताचे मी मलाच सोडवतो 

उगीच पडून व्यर्थामधी काय अस्वस्थ व्हावे 

 वावटळ उठवून बसत मी शांत जागी येतो 


पुन्हा आपण आपलेच बरें खऱ्यासाठी 

प्रेमात मिरवून प्रेम अर्पावे जीवनात 

आपल्यां सोबतच जगणं येते म्हणून 

दुःख सार विसरून बाहेर येतो


शब्दाचे मलम लावतं दोघांना 

दोघांना पण आपलेच मानतो 

जो तो जाच्या त्यांच्या मनस्थितीत

मतानुसार बरोबर तर असणार ना


म्हूणन म्हणतो सोडा हे रिकामे धंदे 

पळभरचे हाय बाय चार दिसाच जिणं रें 

आपण सर्व मानव जातींचे भाऊ गड्यानो 

प्रेमानं मिळून मिसळून राहण्यात खरी मजा रें


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract