STORYMIRROR

Monali Kirane

Abstract

3  

Monali Kirane

Abstract

खरे स्वातंत्र्य

खरे स्वातंत्र्य

1 min
307

देश स्वतंत्र झाला,तरी मनाची कवाडं आहेत बंद

तांत्रिक विकास झाला त्याचा सुसंस्कारांशी काय संबंध?

अजूनही आहे भूकबळी नी फोफावतोय भ्रष्टाचार,

पैसा नाचवतोय सर्वांना अन् खरी गुणवत्ता उभी लाचार.

वरवर आहे स्त्री मुक्ती,पण ॲसिड -अटॅक नी ऑनर-किलींग.

बलवान समाजविघातक शक्ती,आलबेल असल्याचं फाॅल्सफिलींग!

देश स्वतंत्र झाला,आता माणूस मुक्त व्हायला हवा,

सुजलाम् सुफलाम् रामराज्याचा होवो सूर्योदय नवा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract