STORYMIRROR

Monali Kirane

Others

4  

Monali Kirane

Others

असा पाऊस-तसा पाऊस

असा पाऊस-तसा पाऊस

1 min
325

रागावलास का तू सुद्धा

कोसळतोस का उरी फुटून?

विनाशाचं रौद्ररूप

पावसामधे आलं कुठून?

मान्य मला,चूक झाली

माणूस गेला जंगल लुटून.

मन मोठं कर एकदा

माफी दे रे डोळे मिटून.

माणूस शहाणा होईलही

निसर्गाचं दान पटून.

दोन पर्याय तुझ्याकडे

सारं संपव वा शांत हो,

सुंदर नवं जग जन्मो

अराजकाची धूळ हटून!


साहित्याला गुण द्या
लॉग इन