STORYMIRROR

Monali Kirane

Abstract

3  

Monali Kirane

Abstract

जाऊ दे ,असंच चालणार!

जाऊ दे ,असंच चालणार!

1 min
155

कधीपासूनची गायब वीज,

जरी वाढतात दर -आता गळणार फ्रीज.

जाऊ दे असंच चालणार.

कधी खड्ड्यात पाय,नाही फुटपाथ,

डोंबा-याच्या वरताण चाललंय काय?

जाऊ दे असंच चालणार.

कामवाली मावशी हल्ली वटारून डोळे

मारते सुट्ट्या आम्ही ठरतो खुळे

जाऊ दे असंच चालणार.

सोनं नी भाज्यांचे चढते भाव,

गुंजभर अर्धापाव ना आनंदाला ठाव.

जाऊ दे असंच चालणार.

रोग आले फुकट,उपाय दुरापास्त,

वरवरच्या दिखाव्यालाच मान जास्त,

जाऊ दे असंच चालणार.

एकटा दुकटा शहाणा असं काय करणार?

मेंढरांच्या कळपाचं असंच चालणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract