माझा महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र
सह्याद्रीच्या सह्यकड्यांचे , मराठमोळे वीर
देशरक्षणा प्राणपणाने , तळहाती शीर (1)
शूर शिवाजी , छाव्याची महाराष्ट्र कर्मभूमी
पेशवाईची , रामशास्त्रींची
कामगिरी नामी (2)
भारतमाता मुक्त कराया ,
देशभक्त थोर
कवटाळिती प्रत्यक्ष यमा , सोडुनी संसार (3)
कर्मभूमी मराठमोळी , संगीत कलासक्त
आशा लता ग दि मा निरविवर्मा भक्त (4)
अभंगातही थोरसाधना, ज्ञाना , तुकयांची
एकनाथी भारुडे नि आर्या मयूरपंतांची (5)
वारक-यांची परंपरा , भक्तिमार्गा लाभली
पंढरीच्या विठूरायापायी , भावभक्ती लोटली (6)
लोकधारा ह्या भूमीची , लावणी ,गण ,गौळण
लोकनाट्य , कथा , गजाली,
कर्णमधुर कीर्तन (7)
साहित्यगंध दरवळतसे , अवघ्या विश्वात
बहिणाबाई , शांताबाई ,
पु. ल. वा. रा. कांत (8)
स्त्रिया प्रगतीशील , सर्वोच्च
पद भूषविले
फुले नि कर्वे दांपत्यांनी , ज्ञानामृत दिधले (9)
वारस राज्याचे , वाढवू शान
महाराष्ट्राची
कीर्तीगंध दरवळो , ही मनीषा मनीषाची (1)