STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Tragedy

4  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Tragedy

"शेतकरी आंदोलन आणि कृषिकायदा"

"शेतकरी आंदोलन आणि कृषिकायदा"

1 min
191

जुलूम जबरदस्ती तुम्ही करू नका हो 

शेतकरी मायबापाचा घात करू नका !! धृ!!


खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात त्यांना पाठवू नका 

खोटे आरोप टाकून त्यांना तुम्ही विनाकारण मारू नका 


फसवे आमिष दाखवून त्यांना आता तुम्ही हो फ़सवू नका 

भारत देशाचे जय किसान हे ब्रीद वाक्य सत्य हाय हे कधीच विसरू नका 


खोटेनाटे आरोप टाकून स्वातंत्र्य त्यांचे हिसकू नका 

भारत देशाच्या कृषिपुत्राना पारतंत्र्यात आता टाकू नका 


त्यांच्या जीवावर पोट भरतो याची जरासी लाज धरा 

जूलमी कृषिकायदा बंद करून आता तरी सुधरा 


हक्क कायद्यात त्यांचा ठेवा भूमीहीन तयासी करू नका 

अहिंसक आंदोलन शेतकर्यांचे चिघळून जालियनवाला बाग हत्याकांड घडवू नका 


निरपराध शेतकरी बांधवांना मारून पुरुषार्थ तुम्ही गाजवू नका 

छळून छळून त्यांचे हाल केले उपाशी त्यांना मारू नका 


थंडीवार्यात शेतकरी देशाचा मागण्या मागताना प्राण गेला 

त्यांच्या रक्ताची रक्तरंजित क्रांती, देशाला इतिहास मिळाला 


न्याय हक्कासाठी लढता,लढता क्रूर थट्टा करून अन्याय झाला 

खोटी कारणे सांगून त्यांचा जीव वेठीस सतत धरला 


खोटे गुन्हे दाखल करून आंदोलनाला विरोध केला 

माणूसकीचा क्रूर कळस गाठूनी कृषीकायदा त्यांच्या माथी मारला 


मूठभर लोकांसाठी त्यांनी देशविक्रीला वेगात काढला 

राजकीय सत्तेचा वापर फक्त धनदांडगे भले करण्यास झाला 


लोकशाहीचा घात करण्याला EDचा सर्रास वापर केला 

लोकशाहीचा आवाज त्यांनी दाबण्यास विक्रम केला 


त्यातच बळी राजाचा बळी चालला कृषीकायदा जुलमी देशाला 

शेतकरी देशाचा आपल्या भिकारी करण्याचा गुपित डाव चालला 

कृषीकायद्याच्या आडून आपला देश गुलामशाहीकडे झुकला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract