ही वाट दूर जाते
ही वाट दूर जाते
रानातली पायवाट
आहे खूप गंधित
दोन्हीकडे सजल्यात
वृक्षी वेली ह्या रंगीत (१)
वृक्षा बिलगल्या वेली
मनमोकळेपणाने
खात्री विश्वासाची तयां
विसावती आनंदाने (२)
वाटेवर लागे पुढे
हिरवळ ओलीगार
पक्षी बागडती मोदे
वनी हवा थंडगार (३)
वाटेमधे करवंदे
मुले खाती तृप्तपणे
दरवळ सुमनांचा
माळूनिया केसांमधे (४)
रानातली पायवाट
नगराला मिळतसे
शांत रम्य पायवाट
सकलांना भावतसे (५)
