STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract Others

4  

Kanchan Thorat

Abstract Others

सत्संग

सत्संग

1 min
309

उगाच कधी, गहिवरुन येते,

उगाच कधी, वाटतो उल्हास,

मन माझे हे, वेडेपिसे,

सुखाच्या शोधात...!


रात्र नाही, दिवस नाही,

व्याकुळ सारा काळ....

सूर्य नाही, चंद्र नाही,

ना रंग कुठे ना गंध....


शामल माझ्या मनोवेदना,

शामल हा आनंद...

शामल सावळ्या भेट तू आता

झिजतो नुसता देह


अलगद सारे मिटून टाक

होऊ दे मज मुक्त...

या आत्म्याचा परमात्म्याशी 

होऊ दे सत्संग..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract