स्वर्ग
स्वर्ग
किती छोटी परि टुमदार घरांची रांग
नील नभाचे छत्र लाभे दैवयोगास
गोजिरी साजिरी रंगीत फुलली बाग
गर्द हिरवे वृक्ष कमानी धरण्यास
निसर्गाची रंगउधळण मुक्त जोसात
मेघदूतही डोकावती अवनी बनात
मनी मुग्ध जाहली पांढरी पाऊलवाट
मंद सुगंध दरवळे आसमंतात
भासे स्वर्गच अवतरला मधुबनात
नीरव शांतता सुखवीते अंतर्मनास
मज गमे निसर्ग वेडा कलाकार
लुभवी रंगसृष्टीने सकल जनमानसास
