संयमाचे महत्व
संयमाचे महत्व
संयम फार मोठा गुण
मानवी जीवनामधे
मनाच्या लाटा थोपविणे
कौशल्य आयुष्यामधे (१)
राग लोभ क्रोध मत्सर
मनी उफाळून येती
आवर विवेके घालूनी
संयमास रुजविती (२)
शब्द हे शस्त्र जाणावे
शब्दांशब्दांनीच घात
अडसर बोलण्यास
असे संयमाचा खास (३)
उतावीळ प्रतिक्रियेने
नात्यांचे बंध तुटती
काळ लोटल्यावरी
येई संयमाची प्रचिती (४)
संत महंताच्या ठायी
संयमाची ये प्रचिती
रुजता बीज संयमाचे
लाभे मान यश किर्ती (५)
