आठवण.....
आठवण.....
आठवणींच्या हिंदोळ्यावर हळुच उमले ती आशा
मग जाई मन हळूच प्रियाच्या देशा...
जागती मनी अंतरीची भावना
प्रेमाची शक्ती देई नवप्रेरणा...
वाट बघतो सखे तुझ्या येण्याची
सुरुवात करून मग पुन्हा जगण्याची...
तुजविण येई वेदनेचा उमाळा
सय तुझी येता दाटून येई गळा...
तू येता नाचे मनमोर थुई थुई
पावसाची सर मनात बरसत येई....
