STORYMIRROR

Rekha Gavit

Fantasy Inspirational

3  

Rekha Gavit

Fantasy Inspirational

अरे अरे मानवा....

अरे अरे मानवा....

1 min
222

अरे अरे मानवा एक ठेव ध्यानी

एक तरी झाड लाव, ध्यास घे मनी

तुझी माय ती धरणी

जप तिला होऊन तिचा ऋणी...

चराचर जगात तोडू नको अन्नसाखळी

प्राणी, पक्षी होऊ दे तुझ्या बंधातून मोकळी

झाडे-झुडपे नदी-नाले देती तुला आरोळी

वनसंपदेची तू थांबव आता होळी...

पेर तु चांगले सुखी होईल पिढी

वनचरे देतील तुला साथ ,सोडून सारी अढी

पर्यावरणाचा समतोल ठेवून बसव आता घडी

तुझ्या विकासाची उंच जाईल शिडी....

अरे अरे मानवा एक ठेव ध्यानी..........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy