STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Fantasy Inspirational

3  

Ganesh G Shivlad

Fantasy Inspirational

दुकान सुखांचे

दुकान सुखांचे

1 min
238


जिंदगीच्या बाजारात मी, 


दुकान सुखांचे थाटले आहे..!


आनंदाच्या तराजूत मी, 


चैतन्य फुकट विकतो आहे..!




आनंद घ्या हो चैतन्य घ्या, 


विनामूल्य मी आज वाटत आहे..!


नकोत पैसे मला वचन द्या, 


तुम्ही ही वाटणार हे जगात आहे..!




खुप आहे शिल्लक, या केव्हांही, 


दुकान सुखांची ही आपलीच आहे..!


आणा पिशवी सोबत मोठ्या मनाची, 


ना दोन हातात हे मावणार आहे..!




भरपूर घ्या, मनसोक्त उपभोगा, 


सारं काही हे तुम्हासाठीच आहे..!


पण प्रेमाने तुम्ही वाटा इतरांनाही, 


त्यात वाटा थोडा त्यांचाही आहे..!




ना मारणार काटा येथे मी, 


ना मी मापात पाप करणार आहे..!


ना देणार मोजून मापून मी, 


शिगोशिग मी देऊन जाणार आहे..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy