जादूचे गाव
जादूचे गाव
स्वप्नात मी पाहिले जादूचे गाव,
पण गावाला नव्हते कोणतेच नाव,
होते तेथे वास्तव्य सोनेरी पऱ्याचें,
त्यांचे होते बंगले बिस्किटांच्या आकाराचे,
सोनेरी पऱ्यांकडे होती छडी एक जादूची,
मुकुटांवर होती त्यांच्या छोटी नक्षी चंद्रांची,
गावात होती बाग गोड गोड चॉकलेटची,
होती तेथे झाडे डेरीमिल्क कॅटबरीची,
कॅटबरीच्या झाडांना फुले होती जेलीची,
उंच उडत होती हरणे तेथे सोन्याची,
इथून तिथून भरभिरे फुलपाखरू रेंगीबेरंगी ,
जादूचे पक्षी दिसे तसे खूपच अतरंगी,
खळखळ वाहत होता झरा निळ्याशार पाण्याचा,
आनंद घेत होत्या जलपऱ्या त्यात पोहण्याचा,
मऊ मऊ बर्फ पडे हिरव्यागार गवतावर,
अन् चांदण्यांचा झुला झुले त्या उंच झाडांवर,
आली जोरात हाक माझ्या आईची
दिसेनाशी झाली दुनिया माझी स्वप्नांची
जादूच्या गावात रात्री फिरून आली,
अन् स्वप्नातील दुनिया स्वप्नात ठेऊन आली.