धावपळीचे जीवन
धावपळीचे जीवन
धावपळीच्या जीवनात एक दिवस तरी असा यावा जो दिवस फक्त आपल्यासाठी अन आपल्या कुटुंबासाठी असावा.
बघा ना आज सर्वत्र निरव शांतता..
कोण न कुठे जाई, कोण न कुठे येई..
लोकांची गर्दी नाही, गाड्यांचे प्रदूषण नाही..
बोलणे नाही की चालणे नाही..
कधी न थांबणारी रेल्वे आहे स्तब्ध.
चर्च, मंदिरे, मजिद ठेविले आहेत बंद
वातावरणात कमालीची आहे शांतता
पक्ष्यांचा किलबिलाट अन कोकिळेचा मंजुळ स्वर
आज ऐकू येतोय परिसरात...
रोजच्या ट्रेनच्या सीटसाठी करावा लागणारा आटापिटा, त्या ट्रेन चा गुदमरणारा प्रवास,
ऑफिसच्या कामाचे टेंशन
टार्गेट, बॉस ची नकोशी बोलणी
यातच जातो दिवस
भरून
मी कोण आहे माझं अस्तिव काय आहे हे गेलीय मी विसरून
आईबाबाची विचारपूस करायची मी दिली आहे सोडून..
यासाठीच करोना नावाचा व्हायरस कदाचित देवाने मुद्दामून पाठवला असेल या धरतीवर
हा विचार करून की कदाचित ह्या पळणाऱ्या जगात दहा मिनिटे सुद्धा स्वतः साठी देऊ शकत नाही ही लोक....
म्हणून आता वेळ द्या स्वतःसाठी अन घरच्यांसाठी
मार्केट चे येते का टेंशन... थोडे दिवस सर्वच येणार डबगाइला... पण परत हळूहळू होईल की पुर्ववत..परत करू आपण जोमाने सुरुवात..
आज फक्त आपणच नाहीत तर पूर्ण जग घरात आहे बसून.
म्हणून कमी करा जरा धावपळ
थोडे दिवस द्या सर्व सोडून
मग बघा करोना व्हायरसही जाईल पळून