झेप तिच्या कर्तृत्वाची
झेप तिच्या कर्तृत्वाची
1 min
553
घेतली आहे स्त्रीने
झेप तिच्या कर्तृत्वाची,
आता नकोच तिला
सहानभूती कोणाची,
पडून धडपडून तिने
सावरल जीवनात स्वतःला,
आता कुठे शिकली ती
उंच भरारी घ्यायला,
शिक्षक म्हणा की वकील
सर्वांपुढे आहे ती आता
वेळ नाही जवळ तिच्या
करण्यास फुकटच्या बाता
स्वबळावर उभं राहून
सक्षम केलं तिने स्वतःला
स्त्री कमजोर नाही
हे दाखवून दिले जगाला