कविता :- जीवन नाट्य"
कविता :- जीवन नाट्य"
1 min
13.7K
आयुष्याच्या रंग मंचावर
जीवन नाट्य करावेच लागे
तेव्हाच हे जीवन माझे
हळूहळू पुढे पुढे चाले
जीवनात ये जा करी
दुःखांच्या सागरी लाटा
पण चेहऱ्यावर आणावा लागे
नकली हसरा मुखवटा
चोहोबाजूंनी घेरले मजला
नशीबांच्या अपयशानीं
पण केली मात मी
स्वतःच्या सामर्थ्यांनी
डोंगराएवढया दुःखांना
कधीच नाही फुटला पाझर
तेव्हा मी च करू लागली
त्या दुःखांचा आदर
आगळा वेगळा शिल्पकार
तूच हो तुझ्या जीवनाचा
होऊनी जाऊदे रंगमचावर
खेळ जीवन रुपी नाटयांचा
खेळ जीवन रुपी नाटयांचा....