पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
नाही विसरले मी अजूनही
माझ्या पहिल्या प्रेमाला
आठवणीची भरती येती
माझ्या दुःखीत मनाला
आरपार जावं हृदयातून
असे नाते होते ते आमचे
आम्ही दोघांनी ते किती
विश्वासाने होते जपले
मैत्रीच्या वेलीवर फुटलेली
पालवी आमच्या प्रेमाची
पण कोण जाणे भयानक
नजर लागली कोणा दृष्टाची
गोंडस सोनचाफ्यापासूनी
सुवास जसा घ्यावा हिरावूनी
तसेच त्याच्यापासूनी मी तर
गेली खूपच दुरावूनी
नशीबाच्या मस्करीने झाले
अंतर आमच्य
ा नात्यामध्ये
पण अजूनही आहे भावना
एकमेकांच्या मनामध्ये
आज परत मारली फुंकर
धूळ बसलेल्या प्रेमावरी
आयुष्यात हवी साथ त्याची
बाळगून हे एक स्वप्न उरी
पहिल्या प्रेमाची ही भावना
राहूनी मनातच अशी साचून
आवडतोस मला तू खूप रे
हे सांगायचे गेले राहून
पहिलं वहीलं प्रेम माझं
अपूर्णच असं राहिलं
प्रेम भावनेच्या ओघाला
मी आता कुलूप लावलं
प्रेम भावनेच्या ओघाला
मी आता कुलूप लावलं