प्रेमाची कविता
प्रेमाची कविता
हार्टशेप केक अन गिफ्ट्स
यांची अदलाबदल पाहिली
आईबाबांची पूर्ण खोली
गुलाब फुलांनी सजली
त्यांच्यासंगे डिनरला जाण्यास
मीही तयार होऊनी बसले
उधळलेले प्रेमाचे लाल रंग
घरात चोहीकडे पसरले
राहणार होते दोघेच घरात
वृद्ध आजी आजोबा आमचे
गुंतले आजोबा सेवा करण्यात
खाट्यावरील आजारी आजीचे
श्रमून जात असे आजोबा
रोज करुनी शुश्रूषा आजीची
एक प्रभावी दिव्य शक्ती जाणवी
मला त्यांच्या प्रेमळदायी प्रेमाची
रोजच सहन करुनी आजी
रात्रभर त्रास खोकल्याचा &nbs
p;
आजोबा बिचारे बसून राही
घेऊनी हाती पेला पाण्याचा
बोलण्यास धजले आईबाबा
त्यांना दोन शब्द प्रेम आदराचे
कोणतीच सेवा न मदत नाही
फक्त द्यायचे ताट जेवणाचे
खाटेवरच्या आजीचे मन
रडायचे आजोबाला बघूनी
वृद्ध जीवन नको असे
देवाला दाखवी बोलूनी
गिफ्ट अन डिनरचे ते
गुलाबी प्रेम आईबाबांचे
तर इथे सेवेत गुंतलेले
मन आमच्या आजोबांचे
प्रेमाचे दोन भिन्न रुपे
पाहिले मी एकाच घरात
एकीकडे प्रेम चांदण्या फुलात
दुसर निस्वार्थी प्रेम जीवनात...