दिवाळी
दिवाळी
उगवूनी माह कार्तिकेचा
सण आला दिवाळीचा
हर्षभरात आली दिवाळी
अन बहीन भावाला ओवाळी
मांडल्या पणती दारोदारी
लावल्या आकाशकंदील घरोघरी
काढुनी दारी रांगोळी रंगीन रंगांची
रेलचेल झाली दिवाळीच्या फराळाची
फराळात बनवूनी लाडू, चकली, चिवडा
आरास मांडुनी झेंडू,जास्वंद,घेवडा
फटाक्यांची आतजबाजी उधळण कारंज्याची
आनंदाने धुंद हरपुनी जाई लहान मुलांची
प्रत्येकाचे घर दिसे रोषणाईने सजलेले
अन् तन-मन असे उल्हासाने भरलेले
अंगणात पडली फुलांची रास
अन् घरातून येई चंदनाचा सुवास
सोनियाची नवीन पहाट उगवली
तेजाची दीपोमय वाट उदयास आली
आचार विचार घेऊनी नवे
सोडूनी देऊ दुर्विचार जुने
दिवाळीचा सण जावो सुखाचा
अन् घरात प्रकाश येवो आनंदाचा
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा