पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
विषय : पहिलं प्रेम
शीर्षक : माझे प्रेम
वाजली प्रेमाची ही शिटी
माझ्या ह्या धकधकत्या हृदयात
पण का कळेना हे मला
मी अशी का दिसे तुझ्यात
कसे होऊनी बसले रे
माझे प्रेम हे तुझ्यावरी
आता हक्कही आहे माझा
तुझ्या या श्वासो श्वासावरी
थोडी बावरली होती मी
तुला अचानक बघूनी
अन् पार लाजून गेली मी
तुझ्या मिठीत विसावूनी
तुझ्या ह्या स्पर्शानेच झाले
मी तर फार मग्नमुंग्ध
अन् तेव्हा सर्वांस आला
आपल्या प्रेमाचा सुगंध
खुप लावून गेली रे मी
जीव असा तुझ्यावरी
अन् स्वप्नातील ती कथा
आता होऊ लागली खरी
आनंदले माझे मन हे
प्रेमाने न्हाहले हृदय हे
सौख्याने भरले नाते हे
जन्मोजन्माचे बंधन हे
तुझे अन माझे प्रेम हे,
तुझे अन माझे प्रेम हे !